नागपूर: विमानात आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याची सूचना हवाई सुंदरींकडून दिली जाते. तीच पद्धत आता खासगी ट्रॅव्हल्स बसमध्येही बंधनकारक राहणार आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये बसच्या दर्शनी भागात चालकाचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती लावली जाणार आहे. त्यासोबतच बसेसमध्ये विमान प्रवासासारखे आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे, याबाबतच्या सूचना देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

हेही वाचा… ‘कशाला पाहिजे मोदी?’ गृहिणीचा महागाईवरून सवाल; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची उडाली भंबेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वृत्ताला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पूर्व नागपूर रवींद्र भुयार यांनी दुजोरा दिला. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर प्रवासी खासगी बसने प्रवास करतात. त्यामुळे लवकरच त्याबाबतची अंमलबजावणी होणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी सांगितले.