नागपूर : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्याचा पण ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध कुणबी आणि ओबीसी समाजात होत आहे.

हेही वाचा – ग्राहक आयोगातील नियुक्या रखडल्या.. देखरेख समितीबाबत ग्राहक पंचायतचे म्हणने काय?

हेही वाचा – चंद्रपुरात २५ प्रकारच्या गवताची नर्सरी व टिश्यू कल्चर लॅब उभारणार; मुनगंटीवार यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील संविधान चौकात कुणबी, ओबीसी कृती समितीतर्फे साखळी उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला कुणबी, तेली, माळी, पोवार समाजाचा पाठिंबा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघानेदेखील सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा विरोधात अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार केला. ते उद्या, गुरुवारी नागपुरात आमरण उपोषण करणार आहेत, असे त्यांनी आज जाहीर केले.