scorecardresearch

सत्ताधाऱ्यांचा सीबीआयवर विश्वास नाही का ?; अजित पवार यांचा सवाल

सत्तापक्षाने गोंधळ न घालता कामकाज चालू द्यायला हवे. परंतु त्या उलट त्यांचे वागणे आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून असल्याची टीका त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांचा सीबीआयवर विश्वास नाही का ?; अजित पवार यांचा सवाल
संग्रहित छायाचित्र

नागपूर: सत्ता पक्षातील आमदारांनी दिशा सालियन मृत्य प्रकरणावरून नौटंकी चालवली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय या केंद्राच्या संस्थेकडून केला असून सत्ताधाऱ्यांना त्यांच्यावर विश्वास नाही का, असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

विरोधी पक्षातील आमदार सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून प्रयत्नरत आहेत. अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येत आहेत. मात्र सत्तापक्षातील आमदार गोंधळ घालतायेत. वास्तविक पाहता नासुप्रमध्ये झालेला भूखंड घोटाळा आणि त्या प्रकरणी नगर विकास विभागाने दिलेले शपथपत्र यामुळे मुख्यमंत्र्यांना विरोधक घेरणार असल्याची भीती असल्याने ही नौटंकी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. भास्कर जाधव म्हणाले की, सत्तापक्षाचे वागणे बेजबाबदार पणाचे आहे.

हेही वाचा: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

सत्तापक्षाने गोंधळ न घालता कामकाज चालू द्यायला हवे. परंतु त्या उलट त्यांचे वागणे आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून असल्याची टीका त्यांनी केली. सीबीआय ही केंद्रीय संस्था असून गृह मंत्री अमित शहा हे भाजपमधील दबंग नेते आहेत. मात्र त्यांच्या शब्दाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ज्या प्रकारे कुठलीही किंमत दिली नाही. त्याच प्रमाणे सत्तापक्षाचा सीबीआयवर विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी भूखंड भ्रष्टाचार प्रकरणी दिलेल्या शपथपत्रामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दर्शन देखील तयार नसल्याचे जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 15:14 IST

संबंधित बातम्या