लोकसत्ता टीम

नागपूर : कळमेश्वर येथील डॉ. पांडे दाम्पत्याला त्यांच्यासह त्यांच्या रुग्णालयाची बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली गेली. या प्रकरणात शिवसेना, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह तिघांचा समावेश असल्याचा आरोप नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनकडून (निमा) करण्यात आला.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे का ? बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा संताप
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Kalyan, Khadakpada Police Station, School Security, CCTV Installation, Student Safety,
कल्याणमधील शाळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना
Retired police protest in front of Police Commissioner office to Nitesh Rane statement
नितेश राणेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिसांची निदर्शने; जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्यालयासमोर आंदोलन
BJP, Chitra Wagh, criminal public interest litigation, Chief Minister, Eknath Shinde, Sanjay Rathod Pune, TikTok, young woman's death, defamation,
मदत नको, पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, संजय राठोड प्रकरणात मृत तरुणीच्या वडिलांची न्यायालयात मागणी
Senior Shiv Sainik vishnu gawali killed with the help of lover due to immoral relationship
अनैतिक संबंधांमुळे प्रियकराच्या मदतीने जेष्ठ शिवसैनिकाची हत्या
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक”, संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मर्द असाल तर…”
Gold and silver rates
Gold Prices Falling : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण! लग्नासाठी सोने खरेदी करणाऱ्या जोडप्यांसाठी सुवर्णसंधी

टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रपरिषदेत निमाचे डॉ. रवींद्र बोथरा म्हणाले, कळमेश्वर परिसरात हल्ली पत्रकार असल्याची बतावणी करून डॉक्टरांना बदनामीची धमकी देत खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणात निमाचे पदाधिकारी डॉ. पांडे यांनाही बदनामीची धमकी दाखवून हा प्रकार घडला. या गंभीर प्रकरणाची तक्रार कळमेश्वर पोलिसांना दिली आहे. परंतु, अद्यापही त्यावर काही झाले नाही.

आणखी वाचा-गडचिरोली : नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कर्मचाऱ्यांची सुविधा महत्त्वाची? आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर प्रश्नचिन्ह

डॉ. पांडे म्हणाले, आमच्या नर्सिंग होममध्ये एक रुग्ण प्रसूतीसाठी दाखल झाली. पाच दिवसांनी तिला सुट्टी दिली गेली. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकलला दाखल केले गेले. तेथे तिचा मृत्यू झाला. या मृत्यूचा आमच्याशी काहीही संबंध नसताना शिवसेनाच्या शिंदे गटाचे मंगेश गमे आणि जितेंद्र कोल्हे, प्रवीण धरमाळी यांनी स्वत:ला पत्रकार सांगत आमची भेट घेतली. आम्हाला बदनामी करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. त्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयात आम्हाला धमकावत आमच्याकडून पैसेही उकळले. शेवटी कंटाळून आम्हाला खंडणी मागून युट्यूबवर बातमीतून बदनाम करणाऱ्या व स्वत:ला पत्रकार म्हणणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. परंतु अद्यापही पोलिसांकडून हवा तसा प्रतिसाद नाही. पत्रकार परिषदेला निमाचे राज्य महासचिव डॉ. मोहन येंडे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-भंडारा : येराली येथील आश्रम शाळेत ४० विद्यार्थ्यांना विषबाधा

शिवसेनेने आरोप फेटाळले

या प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले, मी सध्या दिल्लीत असून मला या प्रकरणाची माहिती नाही. जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार म्हणाले, डॉ. पांडे यांच्याबद्दल तक्रार आल्यावर तेथील पदाधिकारी डॉक्टरांकडे शहानिशा करायला गेले होते. त्यानंतर काय घडले याबाबत तेथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती घ्यायला लावली. मंगेश गमे म्हणाले, पत्रकार म्हणून आमच्याकडे डॉ. पांडे यांच्या हलगर्जीपणाची तक्रार आली. त्यावर बाजू ऐकण्यासाठी आम्ही डॉ. पांडे यांच्याकडे गेलो. परंतु, पत्रकार परिषदेतून डॉ. पांडे आमची बदनामी करत असल्याने त्यांच्यावर मानहानीचा दावा केला जाईल.