नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षामार्फत महायुतीमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये सहभागी  आठवले गट नाराज झाला आहे. आठवले गटाच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे रिपाईच्या आठवले गटाचे नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला फायदा होणार का?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली २०१२ पासून महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष महायुतीमध्ये आला. आता शिंदे गटाने रिपाईच्या कवाडे गटाशी युती केल्याने आठवले गट नाराज झाला आहे. शिंदे यांनी कवाडेशी युती करण्यापूर्वी महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे आठवले गटाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर म्हणाले. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alliance kawade shinde group ramdas athawale group leaders will meet bjp vmb 67 ysh
First published on: 11-01-2023 at 16:05 IST