Kerala Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये नेहमीच प्रादेशिक पक्षांचा जोर अधिक दिसून आला आहे. त्यातील केरळ या राज्याचा विचार करता, तिथे नेहमीच कम्युनिस्ट विचारधारेची सत्ता राहिलेली आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासमोर (माकप) काँग्रेस व भाजपा असे दुहेरी आव्हान आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनीही लोकसभेत जाण्यासाठी २०१९ पासून केरळमधील वायनाड मतदारसंघाचीच निवड केली आहे. येथे काँग्रेस आणि भाजपाची वाढ होऊ नये यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जीव तोडून काम करताना दिसतो.

केरळमध्ये ‘टीचर अम्मा’चा बोलबोला…

आता याच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराची राज्यात भलतीच चर्चा रंगली आहे. या उमेदवाराला सर्वत्र ‘टीचर अम्मा’ या नावाने ओळखले जात आहे. उत्तर केरळमधील वडकारा लोकसभा मतदारसंघामधून त्या माकपकडून उभ्या आहेत. समाजमाध्यमे असोत वा ठिकठिकाणी लावलेली पोस्टर्स असोत, सगळीकडे ‘टीचर अम्मा’ नावानेच प्रचार करण्यावर माकपने भर दिला आहे. के. के. शैलजा असे नाव असलेल्या या ‘टीचर अम्मा’ यांनी राज्याच्या आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांचे चाहते, तसेच डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते त्या ‘केरळचा अभिमान’ असल्याचे सांगतात.

Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
Devendra Fadnavis, Nagpur Devagiri, Nagpur,
नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न

आरोग्यमंत्री राहिलेल्या शैलजा यांनी करोना साथीच्या काळात वाखाणण्याजोगे काम केल्यामुळे त्या अधिकच प्रसिद्धीस आल्या. अगदी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि माकपचे दिवंगत राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांचे जन्मगाव असलेल्या थलासेरीमध्येही शैलजा यांचाच बोलबाला आहे. तिथेही लोकप्रिय असणाऱ्या शैलजा यांचीच प्रतिमा अधिक झळकल्याचे दिसून येते.

हेही वाचा : “मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल

अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी संवाद

शैलजा या निवृत्त माध्यमिक शिक्षिका आहेत. त्या आपली भूमिका ठामपणे मांडण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडीओदेखील सार्वत्रिक झाला होता; ज्यामध्ये त्या एका वर्गात उभ्या राहून नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत असलेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका समजावून सांगताना दिसत आहेत. हा कायदा धर्मावर आधारित भेदभाव करतो, असे त्या सांगताना दिसतात. त्यांचे असे व्हिडीओ आणि त्या सहभागी असलेले अनेक उपक्रम अशा सर्व माध्यमांमधून त्या मतदारांसमोर जात आहेत. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे ‘डाईन विथ शैलजा’ होय. त्यामध्ये त्या आपल्या मतदारांसोबत जेवण करतात.

वडकारा मतदार संघासाठी शैलजा यांच्या लोकप्रियेतचा वापर

शैलजा यांची जनमानसातील प्रतिमा आणि लोकप्रियता यांचा पुरेपूर वापर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या निवडणुकीकरिता करीत आहे. एकेकाळी वडकारा हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता; मात्र गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये तिथे काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. २००९ पासून काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शैलजा यांना तिथून उमेदवारी दिली आहे. जेणेकरून त्यांची लोकप्रियता माकपच्या पथ्यावर पडेल. २००९ साली या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी माकपच्या पी. साथीदेवी यांचा ५६ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ सालीही त्यांनीच या जागेवरून निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यांचे मताधिक्य तीन हजारांवर आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसच्या के. मुरलीधरन यांनी सीपीएमच्या पी. जयराजन यांचा ८६ हजार मतांनी पराभव केला होता.

‘टीचर अम्मा’ नावाने प्रसिद्ध असलेल्या शैलजा या कन्नूरमधील मत्तानूर मतदारसंघातून आमदार आहेत. त्या आता वडकारा लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार शफी पारंबिल यांच्याशी लढत देणार आहेत. भाजपाने इथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष प्रफुल कृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. वडकारामध्ये ३१ टक्के मतदार मुस्लिम आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मुस्लिमांची मते निर्णायक ठरतील, असे म्हटले जात आहे.

टी. पी. चंद्रशेखरन यांची हत्या

केरळमध्ये २६ एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित १९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये वडकारा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघाला दीर्घकाळापासून राजकीय हिंसाचाराची पार्श्वभूमी आहे. या हिंसाचारामध्ये माकपची कथित भूमिका असल्यामुळे त्याचा परिणाम याआधीच्या निवडणुकांमध्ये झाला आहे.

मे २०१२ मध्ये माकपचे कार्यकर्ता टी. पी. चंद्रशेखरन यांनी बंडखोरी करून पक्षाला राम राम केला. त्यांनी पक्षातून फुटून रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडिया (आरएमपीआय) नावाचा पक्ष सुरू केला. माकपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी के. के. रमा यांनी या नव्या पक्षाची सूत्रे हातात घेतली. त्यामुळे माकपसमोरचे आव्हान तसेच राहिले. त्यानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात त्यांनी वडकारा विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही जिंकली. आपल्या पतीच्या हत्या प्रकरणामधील आरोपींना २०१२ मध्ये निर्दोष ठरविणाऱ्या निर्णयाच्या विरोधात रमा यांनी केरळ उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन्ही माकप नेत्यांची निर्दोष मुक्तता रद्द केली.

५ एप्रिल रोजी एका घटनेमुळे पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला होता. पनूर परिसरामध्ये कथितपणे बॉम्ब बनविताना एका माकप कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेमुळे या मतदारसंघातील हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर पक्षाच्या डझनभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कार्यकर्त्यांनी सांगितले की, हे बॉम्ब त्यांच्या राजकीय विरोधकांविरोधात वापरण्यासाठी तयार केले जात होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकारला लक्ष्य करण्यासाठी पनूरमध्ये ‘शांतता रॅली’ काढली होती. तरुण आणि महिला मतदार राजकारणातील हिंसाचाराच्या विरोधात आहेत. या हिंसाचाराला लोक वैतागले आहेत आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येईल, असा विश्वास लोकांना वाटतो.

हेही वाचा : गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?

शैलजा यांनी २९ मार्च रोजी त्यांची काही छेडछाड केलेली छायाचित्रे ऑनलाइन प्रसारित केली असल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. माकपच्या नेत्यांविरोधात तक्रारी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

वडकारातील त्यांची लढाई ही ‘धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही भारतासाठी’ आहे, असे शैलजा सांगतात. त्या म्हणतात, “जेव्हा भाजपाकडून अनेक वादग्रस्त विधेयके संसदेमध्ये मांडली जात होती, तेव्हा काँग्रेस मौन बाळगून होती. मतदान करताना आपण सर्वांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.” दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या शफी यांनी शैलजा यांच्यावरच मंत्रिपदाच्या काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.