शिवसेनेशी गद्धारी करणाऱ्यांच्या कपाळावरील विश्वासघाताचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. त्यांना जनतेने धडा शिकविण्यापूर्वी भारतीय जनता पक्षच धडा शिकवेल. आम्हीही नजीकच्या काळात ‘ ५० खोक्यांचा हिशोब पुराव्यानिशी जाहीर करू, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सेनेच्या फुटीर आमदारांवर हल्लाबोल केला.

हेही वाचा >>> वर्धा : नोकरीच्या नावावर १८ लाखांनी गंडवले ;गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्धल दानवे यांचा आज शुक्रवारी बुलढाणा येथील गर्दे वाचनालय सभागृहात सत्कार करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दानवे म्हणाले, राज्यात ‘बडे मियाँ , छोटे मियाँ ‘या पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी आमदारच रस्त्यावर उतरून दहशत निर्माण करीत आहेत. कुणी अधिकाऱ्यांना मारहाण करते, कुणी गोळ्या झाडते तर कुणी गंभीर धमक्या देतेय. याचे लोण आता जिल्हा स्तरावरही पोहोचले असून बुलढाण्यात सेनेच्या कार्यक्रमात झालेला हल्ला याचे उदाहरण आहे. मात्र चुन – चुन के मारेंगे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, समोरून दादागिरी करण्यात आली तर आम्ही सुद्धा जशास तशा पद्धतीने उत्त्रर देऊ.

हेही वाचा >>> वाशीम : भल्या पहाटे काळाने साधला डाव! ; उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

याप्रसंगी नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत, वसंत भोजने, छगन मेहेत्रे, चंदाताई बढे, आशीष रहाटे, दत्ता पाटील लखन गाडेकर आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. संचलन गजानन धांडे यांनी केले. कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या मेळाव्यात शिव सैनिकांची गर्दी उसळली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होय, तुम्ही गद्दारच!
यावेळी दानवे यांनी शिवसेना फुटीर आमदार, भाजपासह राज्य सरकार आणि स्थानिय मुद्यांवरुन पोलीस प्रसाशनावर टीकेची तोफ डागली. आपल्याला मोठे करणाऱ्या ‘मातोश्री’ , ठाकरे कुटुंबीय आणि जनता जनार्धन यांच्याशी दगा करणाऱ्यांना गद्धार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा सवाल त्यांनी केला.