नागपूर: शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते व आमदार भरातसेठ गोगावले यांनी मंगळवारी आमदार अपात्रता सुनावणीत छत्रपती शिवाजी महाराज सुरातला गेले होते, म्हणून आम्ही गेलो असे म्हटले होते. त्यावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी विधानभवन परिसरात भाष्य केले.

विधानभवन परिसरात बुधवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, शिवाजी महाराज सुरतेला गेले ते सुरत लुटायला, पातशाही नाक कापायला. तुमच्यासारखे ते सुरत मार्गे दिल्लीला शरण जाऊन मुजरे झोडत बसले नाहीत. आणि हो, मावळे झुकले पण विकले जात नव्हते. तुम्ही तर ‘पन्नास खोके एकदम ओके’, होऊन आले. कोणाला सांगता हे! याबाबत दानवे यांनी एक ट्विटही केले आहे.

हेही वाचा… “धारावी बचाओ, अदाणी हटाव” विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दानवे पुढे म्हणाले, ५० गद्दार सुरातला ज्यांनी मोठे केले, त्यांच्या विरोधात गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सुरातला तलवार घेऊन इंग्रजांच्या वखारी लुटायला, औरंगजेबाचे नाक कापायला गेले होते. शिंदें गटाचे गद्दार सुरातला लपून- छपून पळून गेले होते. गोगावले सारख्या गद्दारांची छत्रपतींचा अपमान करण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे. शिंदें गटातील काही नेत्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्याच्या मुद्यावर हे सर्व गद्दार भाजपमध्ये जाणार आहे. त्यांना शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाशी देणे घेणे नसल्याचेही अंबादास दानवे म्हणाले.