नुकताच अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजय झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव केला. दरम्यान, या पराभवावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रणजीत पाटील यांना नाव न घेता टोला लगावला आहे. अकोला येथे संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – सत्यजीत तांबे प्रकरणावरून बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र? नाना पटोले म्हणाले, “याप्रकरणी आम्ही…”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

यावेळी बोलाताना मिटकरी म्हणाले, महाराष्ट्रच्या विधिमंडळात असे काही आमदार आहेत, जे कोट्यवधी रुपये खर्च करून आमदार झाले आहेत. मात्र, असेही आमदार आहेत, जे नोंदणी केल्यानंतर ही आमदार झाले नाहीत, दुसरंच कोणतरी आमदार झाले. पण माझा सारखा साधारण माणूस रवीदास महाराज, तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचे विचार सांगून एक रुपया खर्च न करता विधिमंडळात गेला, ही ताकद संतांच्या विचारात आहे.

हेही वाचा – “…तर काँग्रेसने कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, हे घोषित करावं”; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना, १५ फेब्रुवारी १९५३ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास महाराजांच्या जयंतीला सुरूवात केली होती. त्याचा उल्लेख आजच्या कार्यक्रम पत्रिकेत आहे, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही भारतीय संविधानाची चार मुल्यं आहेत, त्याचा पाया संत रविदास महाराजांच्या विचारधारेत आहे, असेही ते म्हणाले.