बाभूळगाव नगर पंचायतीतील नगरसेवक अनिकेत गावंडे (२६) यांची रविवारी मध्यरात्री धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>>‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ

बाभूळगाव तालुक्यात अवैध रेती व्यवसायातून गुन्हेगारी वाढली आहे. या रेती व्यवसायात मोठा नफा असल्याने श्रीमंती लवकर येते, या समाजातून गुन्हेगारी, राजकीय क्षेत्रातील अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहे. अनिकेतही अशाच पद्धतीने वर आला होता. या व्यवसायातील स्पर्धेतून नेहमीच वाद-विवाद होत असतात. अनिकेतच्या हत्येमागेसुद्धा रेती व्यवसायातील आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>देशातील वीज हानीचे प्रमाण १२ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य; अवैध जोडण्या, वीज चोरीचा फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. पैसे कमवण्यासाठी त्याने रेती व्यवसायात प्रवेश केला. रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहारकडून बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे त्याचे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले होते. रविवारी मध्यरात्री अनिकेतवर पाळत ठेवून आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. अनिकेत गुन्हेगारी वर्तुळातील असला तरी तो विद्यमान नगरसेवक असल्याने हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. दरम्यान, अनिकेतची हत्या करणाऱ्या आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. सात हजार रुपयांच्या उधारीवरून चाल करून गेलेल्या अनिकेतला दोन भावांनी संपवल्याचे सांगितले जात आहे.