नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ नावाने जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढेच ते त्यांच्या करामतींनीसुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणूनच मग सर्वसामान्य पर्यटक, वन्यजीवप्रेमी, ‘सेलिब्रिटी’ पर्यटक त्यांना पाहण्यासाठी आपला मुक्काम वाढवून घेतात. भारतीय क्रिकेटमधला ‘स्पिनर’ अनिल कुंबळे यांनेही ‘छोट्या मटक्या’ ची ( वाघाचे नाव) एक झलक पाहण्यासाठी ताडोबातील त्याचा मुक्काम वाढवून घेतला. क्रिकेटपटू अनिल कुंबळेने त्यांच्या ताडोबातील सफारीची सुरुवातच बफर क्षेत्रातून केली. एरवी पर्यटक ताडोबाच्या गाभा क्षेत्रात पर्यटनाला पसंती देतात. अलीकडेच येऊन गेलेला ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडूलकरनेसुद्धा ताडोबाच्या गाभा क्षेत्रातून सफारीची सुरुवात केली. त्यानंतर ते बफरमध्ये गेले. मात्र, अनिल कुंबळे सातत्याने बफरक्षेत्रातच सफारी करत आहे, असे वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे व कांचन पेटकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2024 रोजी प्रकाशित
Video : ‘छोटा मटका’ने दिली अनिल कुंबळेला हुलकावणी; अखेर परतीचा मार्ग स्वीकारला
क्रिकेटपटू अनिल कुंबळेने त्यांच्या ताडोबातील सफारीची सुरुवातच बफर क्षेत्रातून केली. एरवी पर्यटक ताडोबाच्या गाभा क्षेत्रात पर्यटनाला पसंती देतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-01-2024 at 20:13 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble extended his stay in tadoba andhari tiger reserve to catch a glimpse of the tiger rgc 76 zws