बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज सकाळी झालेल्या दुर्देवी अपघातात दोन प्रवासी ठार झाले. खाजगी बसचा चालक टायरमधील हवा तपासायला खाली उतरला असता मागून येणाऱ्या मालवाहक वाहनाने धडक दिल्याने हा विचित्र अपघात घडला.
हेही वाचा – चंद्रपूर : स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार – सुनील तटकरे
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गणराज ट्रॅव्हल्सची बस ही मुंबईवरून नागपूरला जात होती. दरम्यान मेहकर (जिल्हा बुलढाणा) नजीक बसच्या टायरची हवा ‘चेक’ करण्यासाठी चालक खाली उतरला. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ‘ट्रॅव्हल्स’ ला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला असून बसमधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमधून एकूण ३७ प्रवासी प्रवास करित होते.