भारतीय वंशाची व्यक्ती इंग्लंडची पंतप्रधान झाली. आता भविष्यात इतर देशातही भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल. कारण देशाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. ते झाडांची पानेच नाही तर मुळांना देखील पाणी घालत आहेत. त्यामुळेच वटवृक्ष मोठा होत आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित सोहोळ्यात अकोला येथील एनकरेज एज्युकेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात फुलपाखरांच्या १३४ प्रजाती; दहा वर्षांचा अभ्यासानंतर शोधनिबंध प्रकाशित

सेवासदन शिक्षण संस्थेच्या ९६व्या वर्धापन दिनानिमित्त रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार सोहोळ्यात संस्थेच्यावतीने प्रांजल जयस्वाल यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे, विशेष अतिथी म्हणून भारतीय संगणक विज्ञानचे लेखक यशवंत कानेटकर, शिक्षक आमदार नागो गाणार तसेच सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत होत्या.

हेही वाचा- ‘मार्ड’च्या संपाने यवतमाळात रुग्णसेवा कोलमडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी राज्यपाल म्हणाले, भारतीयत्त्वाच्या दिशेने जाणारी राष्ट्रीय शिक्षण निती आता आली. पण भारतीय विद्याभारती, रामकृष्ण मिशन यासारख्या संघटनांनी यापूर्वीच त्यादृष्टीनेच पावले उचलली. राष्ट्रीय शिक्षा नितीमध्ये संस्काराला महत्त्व आहे. भारताला संपवण्याचा प्रयत्न काहींनी केला आणि आताही काही अशी स्वप्ने बघत आहेत, पण ते स्वत:च संपतील. भारत ‘एव्हरेस्ट’प्रमाणे कणखरपणे उभा आहे, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. भाषा महत्त्वाची नाही तर समस्या महत्त्वाची आहे. योग्य पद्धतीने ती पोहोचवली तर भाषेचा अडसर राहात नाही, असे यशवंत कानेटकर म्हणाले. शिक्षणाचे बुद्धी सतेज होते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो. किमान आठव्या वर्गापर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावे, असा सल्ला अनिरुद्ध देशपांडे यांनी दिला. महिलांना संधी मिळाली तर त्या काय करु शकतात, हे रमाबाई रानडे यांनी दाखवून दिले. प्रांजल जयस्वाल यादेखील त्याच वाटेवर जात आहेत, असे ते म्हणाले. पुरस्कारामुळे दहा पावले आणखी वेगाने समोर जाऊ, अशी भावना प्रांजल जयस्वाल यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. प्रास्ताविक कांचन गडकरी व संचालन अमर कुळकर्णी यांनी केले.