वर्धा : नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याची बाब स्वागतार्ह म्हटल्या जाते. त्यातही ज्या भागात ते स्थापन होणार असते, तिथल्या जनतेसाठी आनंदाची पर्वणीच ठरते. आता देशात नवी ११३ वैद्यकीय महाविद्यालये यावर्षी स्थापन करण्याचा निर्णय केंद्राने घेतलं आहे. राष्ट्रीय वैद्यक आयोग म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनने तशी घोषणा केली आहे.

देशातील विविध राज्यांत ती मंजूर झाली असून महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत मान्यता मिळाली आहे. जालना, भंडारा, गडचिरोली, वाशीम, नाशिक अमरावती, अंबरनाथ, औरंगाबाद, नेरुळ, नागपूर, बुलढाणा, मूर्तिजापूर, पालघर, मुंबई व हिंगोली येथील प्रस्ताव आयोगाने मंजूर केले आहे. यापैकी नेरुळ येथील महात्मा गांधी मिशन, मूर्तिजापूर येथील साक्षी शिक्षण क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय संस्था व पालघर येथील आयडीयल इन्स्टिट्युट या खासगी संस्थाना महाविद्यालय मिळाले असून उर्वरित शासकीय महाविद्यालये आहेत.

हेही वाचा – नागपूर ते लंडन: चक्क कारने १६ हजार किलोमीटरचा प्रवास

ही महाविद्यालये राज्याच्या जुन्याच प्रस्तावास मान्यता की नवी, याबाबत निश्चित माहिती नाही. कारण हिंगणघाट येथे मंजूर वैद्यकीय महाविद्यालयाचा या यादीत समावेश नाही. ६ जुलैच्या एका पत्रकातून ही यादी जाहीर झाली आहे. केंद्र शासनाने देशात वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. २०२४ – २५ या सत्रात ही सुरू होणार. तसेच यापूर्वी वैद्यक आयोगाने पदव्युत्तर शाखेतील नवीन अभ्यासक्रम तसेच जागा वाढविण्यास मंजुरी दिली आहे.

११० वैद्यकीय महाविद्यालयात नवे अभ्यासक्रम व ४३ महाविद्यालयांत पीजी अभ्यासक्रमच्या जागा वाढणार आहेत. सध्या देशात एमबीबीएसच्या १ लाख ८ हजार ९९० जागा आहेत. तर पीजीच्या ६९ हजार ६९४ जागा आहेत. आयोगाच्या वैद्यकीय मूल्यांकन व मानांकन मंडळाने पीजीचे १०१ अर्ज पूर्वीच मंजूर केलेत.

हेही वाचा – नागपूर : दीक्षाभूमी पार्किंग वाद; शेजारची जागा मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज

२०२८ – २९ पर्यंत पीजी जागा १ लाख ८ हजार ९९० पर्यंत वाढविण्याची योजना आहे. २०१३ – १४ मध्ये देशात ३८७ वैद्यकीय महाविद्यालये होती. महाविद्यालयाची ही संख्या आता ७०६ वर पोहोचली आहे. एमबीबीएस झाल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. म्हणून या जागा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्या जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीजी अभ्यासक्रमच्या प्रामुख्याने एम एस सर्जरी, एम एस ईएनटी, एम एस सायकीयाट्री, एमडी कम्युनिटी मेडिसिन, एम डी पॅथोलॉजी, एम डी रेडिओ डायग्नोसिस यासह अन्य विषयाच्या जागा वाढणार.