लोकसत्ता टीम

चंद्रपूर : कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्षांना अधिक महत्त्व असते. चंद्रपूर जिल्ह्यात ३५० प्रकारचे पक्षी आढळतात. दरवर्षी हिवाळ्यात धरण व नदी परिसरात परदेशी पक्षी भारतात स्थलांतर करतात. इरई धरण परिसरात हिमालय, काश्मीर, लडाखसह युरोप, मध्य‌ आशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि रशिया या भागांमधून पक्षी स्थलांतरित झाले आहे. हे सर्व पक्षी चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिल्लांच्या संगोपनासाठी सुरक्षित अधिवास शोधत हिवाळ्यात दूर अंतरावरून स्थलांतर करतात.

८००० मीटर उंचीवरून उडणारे सुमारे ४००० कि.मी.चा प्रवास करीत बार हेडेड गूज (पट्टकादंब हंस) च्या २४ थव्यांचे आगमन इरई धरण परिसरात झाले आहे. त्यामुळे पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आणखी वाचा-मोकाट श्वान आडवा आला अन् शालेय विद्यार्थी घेऊन जाणारी रिक्षा उलटली

उत्तरेकडे तसेच परदेशात हिवाळ्यात बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. तलाव, सरोवर, नद्या आदी पाण्याची ठिकाणे बर्फाने झाकली गेली आहे. तिथल्या वृक्षांचीही पानगळ होते. त्यामुळे पक्ष्यांना झाड, जमीन व तलावात मिळणाऱ्या अन्नाचं दुर्भिक्ष जाणवत. म्हणुन हे पक्षी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. हे सगळे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करीत दरवर्षी हिवाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरण परिसरात येतात. यात १२ से.मी‌. आकारापासुन २ फुट उंची पर्यंतचे पक्षी यशस्वीरीत्या स्थलांतर करतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. तसेच वन, उद्यान, शेतपीक आणि कुरणं आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात गवत, विविध प्रकारची वनस्पती, कीटक, सरपटणारे जलचर, उभयचर यांची संख्या वाढल्याने खाद्य उपलब्ध असते. म्हणुनच हिवाळ्यात पक्ष्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात स्थंलातरण होते. त्यानंतर चार महिने मुक्काम केल्यानंतर हे पक्षी फेब्रुवारीनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. तोपर्यत इथली वन, भूप्रदेश आणि जलाशयावरच ते मुक्काम करतात. यावर्षी सुद्धा इरई धरण व आजुबाजूच्या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले आहेत. ८००० मीटर उंचीवरून सुमारे ४००० कि.मी.चा प्रवास करत बार हेडेड गूज (पट्टकादंब हंस) चे आगमन झाले आहे. हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्या पैकी एक पक्षी असून तो हिमालय पर्वत ओलांडून भारतात स्थलांतर करीत दाखल झाला आहे.

आणखी वाचा-५०० रुपयांची ऑनलाइन खरेदी अन् बँक खात्यावर १.१८ लाखांचा डल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पट्टकादंब हंस हे हिमालय पार करत तिबेट, कजाकिस्तान, रशिया, मंगोलियाकडुन भारतात विविध ठिकाणी स्थलांतर करून येतात. त्याची चोच केशरी पिवळसर असते. पिवळ्या रंगाचे पाय आणि त्याच्या डोक्यावर व मानेवर काळ्या पट्ट्या असतात. बार हेडेड गूज (पट्टकादंब) यांच्या रक्तामध्ये एक विशिष्ट प्रकारचा हिमोग्लोबिन असतो जो आ्क्सिजन जलद शोषण्यास सक्षम करतो, त्यांना लांब उड्डाणामध्ये मदत करतो. यावर्षी चंद्रपुरातील इरई धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बार हेडेड गूज (पट्टकादंब) या पक्षाचे जवळपास २४ पक्ष्यांचा थवा आढळून आला आहे. सोबतच रुडी शेलडक (चक्रवाक), क्वाटन टील (काणुक बदक), गडवाल (मलिन बदक), नोर्दन पिन्टेल (तलवार बदक), गार्गेनी (भुवयी बदक), कोम्ब डक (नकटा बदक), कआमन टिल (चक्राग बदक) व रेड क्रिस्टेट पोचार्ड (मोठी लालसरी) हे पक्षीही आढळून आले आहेत. मोठी लालसरी आणि काणुक बदक ही मोठ्या संख्येने आढळून आल्याची माहिती पक्षी संशोधक तथा प्राणीशास्ञ अभ्यासक शुभम संजय आत्राम यांनी दिली आहे.