चंद्रपूर : प्रतिबंधित सीपीआय-माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेला अरुण भेलके साडेआठ वर्षांची शिक्षा भोगून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर सध्या चंद्रपुरात मुक्कामी आहे. स्वत:वरचा नक्षलवादी ठपका पुसण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्याने ‘सिटू’च्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या संघटनेचे काम सुरू केले आहे. ‘स्पोकन इंग्लिश’चे वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे तो देत आहे. पत्नी कांचन नन्नावरे हिने कारागृहात लिहिलेले पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहे.

मूळचा बल्लारपूर येथील रहिवासी असलेला भेलके गुरुवारी लोकसत्ता कार्यालयात धडकला. त्याने कारागृहातील दिवस आणि पत्नी कांचन नन्नावरे हिचा मृत्यू, याबाबत सविस्तर माहिती दिली. भेलकेची पत्नी कांचन नन्नावरे हिचा २४ जानेवारी २०२१ रोजी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. भेलके आणि नन्नावरे यांनी सुरुवातीला देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे दोघेही गडचिरोली आणि गोंदियाच्या जंगलात सशस्त्र सीपीआय-माओवादी कॅडरमध्ये सामील झाले. नंतर त्यांना त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये पाठवले होते. भेलके आणि नन्नावरे हे पुणे, मुंबई आणि रायगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने राहत होते. दहशतवादविरोधी पथकाने भेलके दाम्पत्याचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड जप्त केले होते, त्यावर बनावट नावे होती. मात्र, या सर्व आरोपांतून त्याची सुटका झाली आहे.

हेही वाचा – गडचिरोली : सिरोंचातील तांदूळ तस्कर ‘वीरप्पन’ला कुणाचा आशीर्वाद? तेलंगणातील तांदूळ अवैधपणे महाराष्ट्रात

हेही वाचा – आठ नराधमांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, राजूर घाटातील घटना; बुलढाणा जिल्हा हादरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षा भोगून भेलके चंद्रपुरात परत आला आहे. त्याने प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या मार्गदर्शनात ‘सिटू’चे तथा अंगणवाडी सेविकांचे काम सुरू केले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडेही तो देत आहे. त्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथे त्याने शिकवणी वर्ग सुरू केले आहे. पत्नी कांचन नन्नावरे हिने कारागृहात ८०० पाने लिहून ठेवली होती. या सर्वांचे एक पुस्तक तयार करायचे आहे. या पुस्तकात देशभक्ती युवा मंचपासून तर आजपर्यंतच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन असल्याचे त्याने सांगितले. पत्नी सोडून गेल्याचे दु:ख आहे. मात्र, तिच्या इच्छेसाठी समाजाचे काम करत राहणार, असेही तो म्हणाला. नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे अथवा अन्य कोणाशी आपले संबंध नव्हते, असेही भेलके सांगतो. कारागृहात असंख्य महिलांच्या हत्याकांडाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डॉ. पोळ यांच्याकडून मराठीचे धडे घेतल्याचेही त्याने सांगितले.