वर्धा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वर्धा शहर शाखेचे अध्यक्ष मा अरूणभाऊ चवडे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी हा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ मे रोजी पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात लोणखेडा शहादा जिल्हा नंदूरबार येथे आयोजित राज्य कार्यकारिणीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या डॉ मेधाताई पाटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
अरुण चवडे हे अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्यरत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. अंधश्रद्धा विषयक अनेक प्रकारणांचा त्यांनी भंडाफोड केला. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह लावून देण्यात ते पुढे राहले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कथित चमत्कार, जादूटोणा, तंत्रमंत्र यामागील रहस्य व खोटेपणा त्यांनी उलगडवून दाखवीत प्रबोधन केले.
महाराष्ट अनिसच्या समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक व पुढील तिन वर्षासाठी नविन राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया राबवून नविन राज्य कार्यकारिणीची निवड होणार या ठिकाणी होणार आहे. यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवार, शनिवार,रविवार दिनांक ३०,३१,व१जून असे उपस्थित राहणार आहे या तिन दिवसांत विविध विषयांवर चर्चा होवून काही निवडक ठराव, निर्णय घेण्यात येईल. सोबतच महाराष्ट्रभरातील ३६५ शाखेतील पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सर्वात जास्त उत्कृष्ट कार्य केले असेल त्यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात येईल वर्धा शहर शाखेतून राज्य पातळीवर मा अरूणभाऊ चवडे यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे, राज्य महिला विभागाच्या सहकार्यवाह सारीका डेहनकर जिल्हा अध्यक्ष बाबाराव किटे, उपाध्यक्ष यशवंत झाडे, दिलीप उटाणे डॉ हाशम शेख, अरूण कुमार हर्षबोधी, मनिष फुसाटे कार्याध्यक्ष अरुण भोसले, प्रधान सचिव भरत कोकावार, विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ मंजुषा देशमुख प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे, विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह सुनील ढाले, महिला विभागाच्या कार्यवाह व्दारकाताई ईमडवार,वर्धा शहर शाखेचे कार्याध्यक्ष कविता राठोड प्रधान सचिव कल्पना सातव फुसाटे, कार्यकर्ते कविता लोहट, प्रतीभा ठाकूर,पंकजा गादेवार,मारोतराव इमडवार, रूपेश वैद्य, तनू वराडे, डॉ. हरिश पेटकर आदींनी अभिनंदन केले आहे.