नागपूर : बांंगलादेशातून तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा भारतात आणल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी ७० हजार ५०० किंमतीच्या बनावट नोटा आरोपींकडून जप्त केल्या आहेत. तर उर्वरित नोटा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खर्च केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली आहे.

रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ घेतल्यानंतर ग्राहकाने विक्रेत्याला दिलेली ५०० रुपयांची नोट बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर बांगलादेशातून बनावट नोटा आणून भारतात चलनात आणण्याचा प्रकार ३ एप्रिल २०२४ रोजी उघडकीस आला. त्यानंतर नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अधिक तपास करून संपूर्ण साखळी शोधून काढली. याप्रकरणी लखपर मंडल (४२) रा. पश्चिम बंगाल, मामून मंडल (१९) रा. ग्रामीण, पश्चिम बंगाल, यमुना प्रसाद शाह (३५) रा. पुणे, इंद्रजित मंडल (३३) रा. पश्चिम बंगाल, संतोष मंडल (३६) रा. मालदा, किशोर शिंदे (३२) रा. चाकण, पुणे, आणि शशिकला ऊर्फ सानिका दौंडकर (४२) रा. पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

Understanding TCS Rules, Tax Implications on Foreign Remittances, Tax Collected at Source, Capital Gains, send money india to foreign country, marathi news,
‘टीसीएस’च्या तरतुदी काय?
14 people given indian citizenship certificates
‘सीएए’नुसार पहिल्या १४ जणांना भारतीय नागरिकत्व
Malabar Hill, Malabar Hill Residents , made unique manifesto, Malabar Hill resident manifesto, Demand Action on Parking, Demand Action on Traffic, arvind sawant, Lok Sabha Elections, Mumbai news, malbar hill news, marathi news,
नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
al jazeera offices in israel close after netanyahu government order to stop operations zws
इस्रायलमधील ‘अल जझीरा’ची कार्यालये बंद ;नेतान्याहू सरकारचा कामकाज थांबवण्याचा आदेश; उपकरणेही जप्त
Financial burden, Mhada, lease,
भाडेपट्ट्यात सवलत न दिल्याने म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!
bikes are so costly in india, Rajeev Bajaj marathi news
भारतात दुचाकी एवढ्या महाग का? राजीव बजाज यांनी दिलं उत्तर…
Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का

हेही वाचा >>>अपहृत व्यावसायिकाचा शोध लागेना, अकोला पोलिसांपुढे आव्हान; माहिती देणाऱ्यास इतक्या रुपयांचे बक्षीस

पाच आरोपींना पश्चिम बंगाल, तर दोन आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून ७० हजार ५०० रुपये भारतीय चलनात नसलेल्या बनावटी नोटा जप्त करण्यात आल्या. यात ५०० रुपयांच्या ७१ नोटा आहे. या टोळीचा म्होरक्या इनामूल हक (४०) रा. मालदा, पश्चिम बंगाल हा बनावट नोटांचा व्यवसाय करतो. सध्या तो मालदाच्या कारागृहात आहे. पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी तपासात ठिकठिकाणी छाडी घालून आरोपींना अटक केली.

असा झाला भंडाफोड

३ एप्रिल २०२४ रोजी हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस प्लॅटफार्म क्रमांक ६ वर थांबली होती. खाद्यपदार्थ विक्रेता अनिल तिवारी यांच्याकडून एका प्रवाशाने खाद्यपदार्थ घेतले आणि ५०० रुपये दिले. खाद्यपदार्थ ५० रुपयाचे झाले. अनिलने त्याला ४५० रुपये परत केले. मात्र, ५०० रुपयांची नोट बनावट असल्याचा संशय आला. त्याने प्रवाशाला आवाज दिला. पण, तो थांबला नाही. गाडी सुरू झाली. तेव्हा आरपीएफ जवान आशीष कुमार लक्ष्यकारच्या मदतीने त्याला पकडण्यात आले व पुढील तपास सुरू झाला.