नागपूर : सोने, चांदी, ड्रग्स आणि महागड्या वस्तूंच्या तस्करीचे अनेक प्रकार समोर येत असताना आता नागपूर विमानतळावर एक वेगळाच प्रकार उघड झाला आहे. शारजाहहून नागपूरमध्ये येणाऱ्या विमानातून उच्च किमतीच्या सिगारेटची तस्करी होत असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत उघड झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजाहहून आलेल्या प्रवाशांच्या बॅगा तपासताना मोठ्या प्रमाणावर विदेशी ब्रँडच्या सिगारेटच्या पाकिटांचा साठा आढळून आला. या सिगारेट भारतात विक्रीस बंदी असलेल्या प्रकारातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अंदाजे लाखो रुपयांच्या या मालावर सीमाशुल्क विभागाने जप्ती केली असून संबंधित प्रवाशावर कारवाई सुरू आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून सिगारेट तस्करीमागील मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही नागपूर विमानतळावर सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करीचे प्रकार उघडकीस आले आहेत. या नव्या कारवाईनंतर नागपूर विमानतळ सुरक्षा आणि सीमाशुल्क विभागाने तपासणी अधिक कडक केली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

विमानातून कोरियन ब्रांडच्या सिगारेट्सची तस्करी होत असल्याचा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे उघडकीस आला. दोन तस्कर एअर अरेबियाच्या शारजा-नागपूर विमानातून सिगारेट आणताना सापडले. सिगारेटच्या पॅकेट्समध्ये सुमारे दीड लाख सिगारेट आणल्या गेल्या. त्याची किंमत १२ लाखांहून अधिक आहे. ६५० मोहम्मद जाकीर आणि अब्दुल कादीर जहीर अशी पकडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. एअर अरेबियाचे शारजा-नागपूर विमान (जी९-४१५) रविवारी पहाटे ४.१५ वाजता नागपूर

विमानतळावर उतरले. प्रवासी बाहेर पडण्यापूर्वी सीमाशुल्क विभागाच्या तपासणीदरम्यान जाकीर आणि कादीर यांच्याकडील सात पिशव्यांमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्या.

झाडाझडती घेतली असता बॅग्जमधी ६५० पॅकेट्समध्ये सुमारे दीड लाख सिगारेट्स असल्याचे समोर आले. या सिगारेट्स कुठे नेण्यात येणार होत्या हे अद्याप अस्पष्ट आहे. या सिगारेट्स ‘ईएसएसई स्पेशल गोल्ड’ या कोरियन ब्रांडच्या असल्याचे समजते. सध्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. विदेशी सिगारेट तस्करीमागे जास्त नफा मिळवण्याचा हेतू असतो. भारतातील जास्त कर आणि सीमाशुल्क टाळण्यासाठी अशी तस्करी केली जाते.