नागपूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदासा येथील पुरातन गणेश मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पत्नी कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे सामूहिक पठण करण्यात आले. ‘प्रणम्य शिरसां देवं’ आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शंखनाद झाला आणि अथर्वशीर्ष पठणाला प्रारंभ झाला.

हेही वाचा – दीडपट रसाळ संत्री! काय आहे, कशी आहे वाचा सविस्तर

हेही वाचा – ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी, सुषमा अंधारे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदशास्त्र देवेश्वर आर्वीकर गुरुजी, सौरभ जोशी, आदित्य साहूरकर आणि कौस्तुभ पेंडके यांनी व्यासपीठावरून मंत्रोच्चार व अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व केले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. आदासा येथे पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची पहाटेपासून लगबग सुरू होती. पहाटे पाच वाजता भाविक मंदिरात हजर होते.