लोकसत्ता टीम

अमरावती: बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्‍ला करण्‍यात आल्‍याची घटना बुधवारी सकाळी बडनेरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील वडुरा या गावानजीक घडली. या हल्‍ल्‍यात विद्यार्थिनीचा मृत्‍यू झाला असून विद्यार्थ्‍याला जखमी अवस्‍थेत येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. या घटनेने अमरावती आणि परतवाडा शहरात खळबळ उडाली आहे.

संजना शरद वानखडे (२०, रा. कांडली, परतवाडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे, तर सोहम गणेश ढाले (२०, रा. तुळजापूर गांधी, ता. चांदूर बाजार) हा जखमी आहे.

हेही वाचा… वर्धा : ऐकलं का? म्हणे, विद्यापीठातील मूर्तीचे नाक जनावरांनी तोडले; पोलिसांचा अफलातून तर्क

अमरावती-बडनेरा द्रूतगती बायपास मार्गावरील वडुरा गावानजीक हे दोघे रक्‍तबंबाळ अवस्‍थेत दिसून आले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्‍थळी पोहोचले. त्‍यांना जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. डॉक्‍टरांनी संजना हिला मृत घोषित केले. दोन अज्ञात हल्‍लेखोरांनी आपल्‍यावर हल्‍ला केल्‍याची माहिती सोहमने पोलिसांना जबाबातून दिली आहे.

हेही वाचा… पटोले-वडेट्टीवार यांच्यात जुंपली; जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीवरून मतभेद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्‍ल्‍याचे कारण कळू शकले नाही. सोहमच्‍या जबाबात पोलिसांना विसंगती आढळून आली आहे. पोलिसांनी विविध अंगाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हल्‍ल्‍यात वापरण्‍यात आलेल्‍या शस्‍त्राचा शोध पोलीस घेत आहे. सोहम आणि संजना हे दोघे बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाला शिकत होते. दोघेही वडुरा येथे फिरण्‍यासाठी गेले होते, अशी माहिती मिळाली.