scorecardresearch

Premium

कडू स्पष्टच म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, कूछ भी नही बदला

अपंग, निराधारांची कामे होत नसेल तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, या शब्दांत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी सरकारवर टीका केली.

Bachu Kadu criticized government
कडू स्पष्टच म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, कूछ भी नही बदला (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : अधिकारी, आमदारांचे पगार, मानधन ५ तारखेच्या आत बँक खात्यात जमा होते. मात्र दिव्यांगांचे मानधन चार चार महिने जमा होत नाही. सरकार बदल गई, लेकीन कूछ भी बदल हुआं नही. अपंग, निराधारांची कामे होत नसेल तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, या शब्दांत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी सरकारवर टीका केली.

शकुंतला लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘दिव्यांगांच्या दारी अभियानात’ मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

Vijaykumar Gavit Ajit Pawar
“…म्हणून अजित पवार कॅबिनेट बैठकीला आले नाहीत”, नाराजीनाट्यावर विजयकुमार गावितांचं मोठं वक्तव्य
Ajit pawar and devendra Fadnavi
कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार? मंदिर समितीचे सहअध्यक्ष म्हणाले…
Amol Mitkari
“तुमचा पाळीव कुxx लायकीपेक्षा…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा फडणवीसांना इशारा
OBC adamant on march
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही ओबीसी मोर्चावर ठाम का आहेत? शिंदे, फडणवीस यांनी काय संभ्रम निर्माण केला?

हेही वाचा – पती-पत्नीची दहा लाखांनी ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हेगाराने दिले कॅनडात नोकरीचे आमिष

दिव्यांगांची अनेक प्रश्ने आणि दु:ख आहे, असे सांगून बच्चू कडू म्हणाले, या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र ऐवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. दिव्यांग बांधवांसाठी आपण अनेक आंदोलने केली. याच आंदोलनातून हे मंत्रालय उभे राहिले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण दिव्यांगांसाठी लढत राहणार आहोत. दिव्यांगांच्या घरापर्यंत योजना कशा पोहोचविता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – अकोला : खोट्या तक्रारींच्या माध्यमातून चक्क पोलिसांचीच दिशाभूल, नेमकं काय घडतंय…

पुढे कडू म्हणाले, घरकूल, अंत्योदय, शौचालय या योजनांसोबतच येत्या दोन-तीन महिन्यांत दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणल्या जातील. ग्रामीण स्तरावर काम करणारे ग्रामसेवक, कोतवाल, तलाठी, कृषी सहाय्यक, रोजगार सहाय्यक आदींनी या योजनांबाबत दिव्यांग बांधवांना अवगत करावे. केवळ शासन निर्णय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून काम करा. दिव्यांग तसेच निराधारांना १५०० रुपये महिना दिला जातो. मात्र कधीकधी चार-चार महिने पैसे मिळत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे महिन्याच्या ५ तारखेपर्यंत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करावी, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bachu kadu criticized the government he said that if the work of the disabled is not done your post as cm has no meaning rsj 74 ssb

First published on: 27-09-2023 at 10:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×