लोकसत्ता टीम

वर्धा : खरीप हंगामात बोगस कृषी साहित्यावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारीपथक स्थापन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत बियाण्यांचे ४१, खते १५ तर कीटकनाशकाचे ६ नमुने सदोष आढळून आलेत. त्यामुळे असा एकूण ७४ लक्ष रुपये किमतीची कृषी निविष्ठा विक्रीसाठी बंद करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना पैशांची मागणी; विमा कंपन्यांकडून अडवणूक

किटनाशक व रासायनिक खते अमरावती येथील प्रशिक्षण शाळेत तर बियाणे नागपूरच्या बीज प्रशिक्षण शाळेत तपासण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण १ हजार २९२ कृषी केंद्र असून नव्वद टक्के केंद्राची तपासणी झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले. कृषी केंद्रधरक यांच्यविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच ४१ बियाणे कंपन्या व कृषी केंद्रास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. काहींवर कारवाई प्रक्रिया सुरू आहे.