नागपूर : मतदार यादीतील नावे वगळण्यावरून झालेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे त्यामुळे एरवी ईव्हीएमवर बोलणारे महाविकास आघाडीचे नेते मतदार यादीवर बोलू लागले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही अधिकाधिक मतदान करण्याबाबत आम्ही जनतेला आवाहन करीत असताना आमच्यावर मतदार यादीतून नावे गायब केल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते न्यायालयात गेले होते. आता उद्धव ठाकरे काँग्रेससोबत राहून ते स्वत:चा नाही काँग्रेसचा अजेंडा राबवत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. ते नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन” अशी उद्धव ठाकरेची अवस्था

जागा वाटपावरुन उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे त्यांची स्थिती फारच वाईट झाली आणि ते पाहावत नाही. महाविकास आघाडीमध्ये त्यांना कोणी मुख्यमंत्री करण्यासाठी तयार नाही, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यासमोर मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्याबाबत लोटांगण घालत आहे. मात्र आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले पण २०१९ मध्ये केलेली चूक त्यांना भोवली. त्यामुळे आता पुन्हा शरद पवार आणि नाना पटोले तयार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंची परिस्थिती ‘ना घरका ना घाट का’ अशी झाली असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा…दलित असल्याने महायुतीकडून छळ – रश्मी बर्वे; जातप्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही हिंदू विचाराची होती. काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार त्यांना कधी न पटणारे आहे. उद्धव ठाकरे आम्हाला सोडून शरद पवार आणि नाना पटोले सोबत गेले, आता महाविकास आघाडीवर दबाव तयार करुन आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना आघाडीतील नेते सहभागी करुन घेत नाही असेही पटोले म्हणाले. महायुतीमध्ये बहुतांश जागागबाबत निर्णय झाला असून येत्या दोन दिवसात पहिली यादी जाहीर करणार आहे. आमच्यात कुठलेच वाद नसल्यामुळे आम्ही तातडीची बैठक बोलवण्याच्या मागे पडत नाही. अशा तातडीच्या बैठका उद्धव ठाकरे घेऊ शकतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

Story img Loader