भंडारा : ट्रॅक्टरला भरधाव बसने मागेहून धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ४ जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर विर्सी फाटा येथे घडली. लेकचंद गोपीचंद कापगते (५० वर्षे, रा. विर्सी, ता. साकोली) असे मृतकाचे नाव आहे. तर विकास लाडे (४०वर्षे, रा. मारारटोली, गोंदिया) असे आरोपी बस चालकाचे नाव आहे.

ट्रॅकर चालक स्वगावी जात असताना गोंदियाकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बस चालकाने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालक लेकचंद कापगते हे ट्रॅक्टरवरून खाली पडले. लगेच त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साकोली पोलिस ठाण्यात आरोपी बस चालकाविरुद्ध कलम २८१, १०६ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम १८४ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार दिनेश तिजारे करीत आहेत.