भंडारा : शेतात निंदणाचे काम आटोपून निघालेल्या महिला मजुरांच्या ई-रिक्षाला भरधाव कारने धडक दिली. त्यात ९ महिला मजुर जखमी झाल्या. सदर अपघात काल सायंकाळी साकोली जवळ महामार्गावर घडला.

मोहघाटा येथील महिला मजुर हे साकोली शेतशिवारात पोद्दार शाळेजवळ एका शेतात निंदणाच्या कामाला आले होते. दिवसभर काम आटोपून सायंकाळी गावाकडे ई-रिक्षाने निघाल्या. त्यावेळी नागपुरकडे जाणारी कारने ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षामधील चालकासह ९ महिला मजुर जखमी झाले.

अपघात घडताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना भंडाऱ्याला हलविण्यात आले आहे.