भंडारा जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे. मात्र अगदी पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाट कॉपी चालल्याने या अभियानाचा फज्जा उडाला आहे.

हेही वाचा >>>सावधान! गोंदिया गांजा विक्रीचा हब होतोय का?; तरुणाई कोरड्या व्यसनाच्या विळख्यात

आज इयत्ता बारावीचा इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर होता. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी चालणार नाही आणि कॉपी करणारे किंवा कॉपी पुरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात आली. शिवाय जिल्ह्यात एकही संवेदशील केंद्र नसल्याचे मोठ्या अभिमानाने सांगण्यात आले होते. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र काही परीक्षा केंद्रावर दिसून आले. भंडारा तालुक्यातील बेला येथील महिंद्रा शाळा या परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी पुरविण्यात आली. परीक्षा केंद्रावर असलेले शिक्षक आणि पालक यांनी स्वःत विद्यार्थ्यांना कॉपी पुरविली. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या निरीक्षकासमोर हा सर्व प्रकार सुरू होता. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थी गोंधळले आणि त्यांचे काही प्रश्न सुटले असे काही विद्यार्थ्यांनी लोकसत्ता सोबत बोलताना सांगितले. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा >>>गडचिरोली : जमिनीच्या नियमबाह्य व्यवहाराला चाप बसणार काय?; भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण विभागाला या प्रकरणाची माहिती देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत . चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार तसेच ज्या परीक्षा केंद्रावर असे प्रकार आढळून येत असतील केंद्रांवर उद्यापासून भरारी पथक पाळत ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी लोकसत्ता ला सांगितले.