भंडारा : अतिक्रमण काढण्याचे शासनाचे आदेश असल्याने पवनी गडकिल्ला परिसरातील शेकडो अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, आज हा अतिक्रमणाचा वाद चिघळला. अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात आज पुन्हा आंदोलन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी काही आक्रमक आंदोलकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला.
पवनी गडकिल्ला परिसरातील तब्बल १८३ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र अतिक्रमण धारकांनी या विरोधात पुन्हा आंदोलन केले. यावेळी काही आक्रमक आंदोलकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत दोनशेवर अतिक्रमणधारकांना अटक केली व त्यानंतर तात्काळ सुटका करण्यात आली. त्यानंतर पवनी पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पवनी शहरातील गडकिल्ल्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्याचे शासनाचे आदेश असल्याने १८३ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या आदेशाला अतिक्रमणधारकांचा विरोध आहे. पुनर्वसन करून राहण्याची सोय करा, नंतरच अतिक्रमन हटवा, अशी अतिक्रमणधारकांची मागणी आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावरून काही संतप्त नागरिकानी पवनी तहसील कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी पवनी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून काही जणांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.
दरम्यान, आज गुरुवारी या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा देत तहसील कार्यालयाच्या परिसरात साहित्यासह जमा झालेल्या अतिक्रमणधारकांनी लाकडाची होळी करून ती पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यात शेकडो महिला-पुरुषांचा समावेश होता. या सर्वांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सुटका करण्यात आली.