बुलढाणा: चिखली येथील विश्रामगृहात आज पार पडलेल्या जिल्हा बैठकीत मुंबईस्थित विधान भवनावर आयोजित भूमी संघर्ष सत्याग्रह मोर्चाचे नियोजन करण्यात आले. येत्या १८ जुलै रोजी आजाद हिंद मैदानावरून हा मोर्चा निघणार आहे.
राज्यातील बहुजन भूमिहीन, बेघर, कर्जदार, अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्या शासन-प्रशासनाकडील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, यासह अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांनी ही माहिती दिली. मोर्च्यानंतर संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
हेही वाचा… गडचिरोली: नाकाबंदीदरम्यान दुचाकीसह बंदुका सोडून दोघे पसार; अतिसंवेदनशील एटापल्ली येथील घटना
मोर्चात प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, भारतीय दलित कोब्रा संघटनेचे विवेक चव्हान, कामगार नेते बाबुराव सरदार, राज्य प्रवक्ता दिनकर घेवंदे, महिला अध्यक्ष प्रमिला चिंचोले, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सारिका जाधव कोल्हापुर, मराठवाडा प्रमुख भगवान गवई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.