नागपूर : बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदासंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. येथे काँग्रेसतर्फे कोणीही उमेदवारी अर्ज केलेला नाही. त्यामुळे कोणत्यातरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहे.

सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता प्रमुख दावेदार म्हणून भाजप समर्थित नागोराव गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले रिंगणात आहेत. अशा स्थितीत काँग्रेस झाडे की अडबाले यांना समर्थन देते याकडे लक्ष लागले होते.

हेही वाचा >>> नागपूर : महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती चिंताजनक, माजी आमदाराच्या लेटर बॉम्बमुळे कॉंग्रेसमध्ये भूकंप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, बबनराव तायवाडे, रवींद्र दरेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी सुधाकर अडबाले यांच्या काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.