लोकसत्ता टीम

नागपूर: सोन्याच्या दरात सतत चढ- उताराचा क्रम कायम आहे. ९ जानेवारीला नागपुरात सोन्याचे दर ६२ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली आले होते. हे दर ऐन संक्रांतीच्या दिवशी सोमवारी (१५ जानेवारी) ६३ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. त्यामुळे सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांना जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे.

नागपूरसह राज्यातील इतरही भागात सोने, चांदी, हिरे, प्लाटिनम धातूपासून तयार दागिने लग्न समारंभासह विविध सनात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून खरेदी केली जाते. तर आवडीनुसारही या खातूच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढतांनाच दिसत आहे. परंतु आता सोन्याचे दर वाढल्याने हे धातू खरेदीसाठी इच्छुकांमध्ये चिंता वाढली आहे. नागपूर सराफा बाजारातील दरानुसार १५ जानेवारी २०२४ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ९०० रुपये होता.

आणखी वाचा-अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पूरबाधित ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर ५८ कोटी जमा

दरम्यान नागपुरात ९ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ६०० रुपये होता. तर ४ जानेवारी २०२४ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये नोंदवले गेले. रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी हे दर आणखी वाढण्याचे संकेत दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६५ हजार रुपयांपर्यंत दरवाढीचा अंदाज

नागपुरात डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मधील आजपर्यंत सतत सोन्याच्या दरात ६३ हजार ते ६३ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत चढ उतार बघायला मिळत आहे. परंतु आंतराष्ट्रीय बाजारपेठेत आणि देशातील स्थिती बघता हे दर येत्या काही महिन्यात ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याचा अंदाज नागपुरातील सराफा व्यवसायिक वर्तवत आहे.