बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य हरीश शर्मा यांचा वाढदिवस बल्लारपूर पोलीस ठाण्यात ठाणेदार उमेश पाटील यांनी केक कापून जल्लोषात साजरा केला. समाज माध्यमावर या वाढदिवसाची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. यामुळे बल्लारपूर पोलीस दलावर टीकेची झोड उठली आहे.

हेही वाचा >>> खळबळजनक! बनावटी कागदपत्राद्वारे परिचर्या महाविद्यालयाला मंजुरी!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बल्लारपूर शहर भाजपचे सचिव वाजपेयी यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ही घटना ताजी असतानाच या वाढदिवसामुळे भाजप नेते पुन्हा चर्चेत आले आहेत.एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला तर नवल नाही. पक्षाचा नेता म्हणून अनेक पदाधिकारी वाढदिवस साजरा करीत असतात. परंतु, बल्लारपूर पोलीस ठाण्यात ठाणेदार उमेश पाटील यांच्या कक्षात त्यांच्या टेबलवर शर्मा यांचा वाढदिवसाचा साजरा करण्यात आला. ही चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर ठाणेदार पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा >>> नागपूर : भाजपचा पदाधिकारी रोहित माडेवारला अटक, कर्जाचे आमिष देऊन ४६ लाखांनी केली फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. अंमली पदार्थ आणि कोळसा तस्करीसह इतरही बेकायदेशीर व्यवसायावर आळा घालण्याचे आव्हान ठाणेदार पाटील यांच्यासमोर आहे. विशेष म्हणजे, अवैध व्यावसायिकांना स्थानिक पोलीस विभागाकडून एकप्रकारे मूकसंमती असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, शर्मा यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदही सांभाळले आहे. सध्या ते प्रदेश कार्यकारिणीत सदस्य आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या अशा पद्धतीने वाढदिवस साजरा होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.