नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते मणिकांत राठोड यांच्यावर करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे शहर सरचिटणीस डाॅ. गजराज हटेवार यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला जात असून, याबाबत देशाचे पंतप्रधान आणि प्रमुख भाजपा नेत्यांनी मौन बाळगले आहे. समोर आलेल्या ध्वनिफीतमध्ये भाजपाचे उमेदवार मणिकांत राठोड हत्येच्या कटाबाबत बोलत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेऊन मणिकांत राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहर काँग्रेसने अर्जाद्वारे केली आहे.

हेही वाचा – अकोला : ..तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका; १ जूननंतरच कपाशी बियाणे विक्री होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे कर्नाटकात पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांच्या निर्देशानुसार शहर काँग्रेस कार्यालयातर्फे शहर काँग्रेसचे प्रधान सरचिटणीस डाॅ. गजराज हटेवार यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. मणिकांत राठोड गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यापासून खरगेंसह त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मणिकांत राठोड यांच्या विरोधात तक्रार करीत असून त्यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शहर काँग्रेसने केली आहे.

हेही वाचा – वर्धा : बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवा; फौजदारी कारवाई करण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

निवेदन देताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व वाणिज्य उद्योग सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, माजी नगरसेवक रमन पैगवार, अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम खान, माजी नगरसेवक ॲड. यशंवत मेश्राम, बाॅबी दहीवाले प्रामुख्याने उपस्थित होते.