नागपूर : उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा पोपट मेला, अशी टीका केल्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. कर्नाटकप्रमाणे भाजपाचा महाराष्ट्रातील सत्तेचा पक्षी लवकरच भुर्रकन उडून जाईल, भाजपाची स्थिती कर्नाटकपेक्षा वाईट होईल, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांना दिले आहे.

फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत तुमचा पोपट मेलाय. आघाडीचा पोपट उडणार नाही. हे सरकार पूर्णपणे संवैधानिक, घटनात्मक आहे. तुमच्या सर्वांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने कार्यकाळ पूर्ण करेल, असे फडणवीस म्हणाले होते. यावर वडेट्टीवार म्हणाले, महाविकास आघाडीचा पोपट तर मरणार नाही, परंतु भाजपाचा सत्तेचा पक्षी लवकरच उडणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर : चित्त्यांच्या मृत्यूने न्यायालय चिंतेत.. म्हणाले, तत्काळ पर्यायी ठिकाणी हलवा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीची बैठक शरद पवार यांच्या घरी झाली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष बैठकीला उपस्थित होते. सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागा वाटपाचे सूत्र निश्चित करतील. कोणत्या पक्षाला किती आणि कोणती जागा मिळेल. याचा निर्णय योग्य वेळी होईल, पण त्यामुळे फार अडणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्यापुढे भाजपा टिकू शकणार नाही. कर्नाटकपेक्षाही वाईट स्थिती भाजपाची होईल.