नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला. आता नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेला जागा सोडली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> नागपूर : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी, सेनेसाठी सुटलेल्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचा प्रयत्न आहे की सेनेचे उमेदवार, डायगव्हाणे आणि कपील पाटील यांचा उमेदवार, यांच्यात बैठक घेऊन हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारासोबत राहू. कॉंग्रेसमध्ये कुणाचीही आणि कशाचीही नाराजी नाही. कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, तो कुठे आहे  दाखवा, असे आव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ‘ते’ सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय, असे नाना पटोले म्हणाले.