गोंदिया : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभेवर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नेमणूक केली. काँग्रेस पक्षाचा आजपर्यंतचा इतिहास व अनुभव पाहता, एका विभागातच प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेता, असे दोन दोन महत्त्वाचे पद काँग्रेसकडून दिले जात नाही. याचाच अर्थ, आता काँग्रेस पक्षातील नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पर्व संपणार आहे, असे भाकीत भाजपाचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी गोंदिया येथे केले.

येथील राईस मिल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपा आणखी मजबूत व्हावी याकरिता माझे प्रयत्न राहणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत लवकरच काँग्रेस पक्षात एक मोठे खिंडार पडल्याचे आपल्याला पहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट हा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपासोबत आल्यामुळे नक्कीच पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत किंवा लोकसभा व विधानसभेच्या असो, त्यात भाजपाचेच उमेदवार निवडून येतील. एक ओबीसी समाजाचा सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आज देशाचा पंतप्रधान झाल्यामुळे ओबीसी समाजात उत्साह आहे. अशा परिस्थितीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ओबीसी समाज भाजपासोबत जोडला जावा, यांचे ऋणानुबंध अजून घट्ट व्हावे, त्या अनुषंगाने आपला हा दौरा असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा – खबरदार! गोठ्यातील जनावर वर्दळीच्या रस्त्यावर सोडल्यास…

हेही वाचा – उत्तर गडचिरोलीवरील ‘हत्ती’ संकट गडद, हल्ल्यात शेती व घरांचे नुकसान; नागरिक दहशतीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रपरिषदेला महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गीते, माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येशूलाल उपराडे, लोकसभा प्रभारी विजय शिवणकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते.