नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही एका शक्तीविरोधात लढत असल्याचे सांगून राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये असल्याची टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. याकडे राज्याचे मंत्री व भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हा बालिशपणा असल्याचे प्रतिउत्तर दिले. ते नागपूर विमानतळावर सोमवारी पत्रकारांशी संवाद साधत होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याया काढण्यात आली. या यात्रेची रविवारी मुंबईत सांगता करण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबईत भव्य जाहीर सभाही घेतली. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा >>> यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; पिकांचे नुकसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामधून राहुल गांधी यांनी मुंबईतील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हे खरे आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हिंदुस्तानच्या प्रत्येक संस्थेत आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागात आहे. इव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाही. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले की विरोधी पक्षाला हे मशिन दाखवा. उघडून दाखवा. हे कसे चालते आमच्या एक्स्पर्टला दाखवा. पण त्यांनी दाखवले नाही. मत मशिनमध्ये नाही. मत कागदात आहे. तुम्ही मशिन चालवा, पण कागदाचीही मोजणी करा. पण ते म्हणतात कागदाची मोजणी करणार नाही. सिस्टमला ही मोजणी नको आहे.”, अशीही टीका त्यांनी केली. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले. ईव्हीएमवर राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केला असलेतर अशा पक्षाला हजारो वर्षे मतदानाच करू नये, ईव्हीएम कोणी आणला, ईव्हीएम भाजपने आणला नाही तर तो काँग्रेसने आणला आणि आज ईव्हीएमवर खापर फोडतात. पण ते असे करताना कर्नाटक, हिमाचल प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुक जिंकल्यावर मात्र मोदींचा पराभव असल्याचे सांगतात आणि स्वत: पराभूत झाले की ईव्हीएमला दोष देतात. हा संपूर्ण बालिशपणा आहे, असेही ते म्हणाले.