रामकथाकार  धीरेन्द्र कृष्ण शास्त्री महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांच्यातील वाद विकोपाला जात आहे. हिंमत असेल तर श्याम मानव यांनी अन्य धर्मीयांची पोलखोल करून दाखवावी,असे  आव्हान  भाजपचे आमदार मोहन मते यांनी दिले आहे. नागपुरात बाबांची रामकथा आयोजित करण्यात आली होती. त्यातील ‘दिव्य दरबार’ वर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता.

हेही वाचा >>> दावोस परिषदेतील गुंतवणुकीवरून वाद : राज्यातील कंपन्यांशीच करार केल्याचा विरोधकांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. तसेच धीरेन्द्र कृष्ण शास्त्री महाराजाला चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते.  यावर याबाबत रामकथा आयोजन समिती संबंधित दक्षिण नागपूरचे भाजपच आमदार  मोहन मते यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संघटनेचे प्रमुख  श्याम मानव यांना आव्हान दिले आहे. मानव यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी अन्य धर्मांचीही पोलखोल करावी.फक्त हिंदू धर्म,सनातन धर्म आणि साधू-संतांना बदनाम करण्याची मोहीम श्याम मानव यांनी सुरू केली आहे. फक्त  प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू आहे,असे मते यांचे म्हणने आहे.