पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समृद्धी महामार्गासह विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी रविवारी आगमन होत आहे. त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने आगामी महापालिका निवडणुका बघता भारतीय जनता पक्षाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जात आहे. भाजपचे सर्वच माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त गर्दी जमविण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वच त्यादृष्टीने कामाला लागले आहे.

हेही वाचा- नागपूर : सात वर्षानंतर प्रथमच मेट्रो उद्यापासून सर्वमार्गांवर; पहिला टप्पा पूर्ण, लोकार्पणास सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला आणि ज्या मार्गाने ते जाणार आहे त्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी व्हावी यासाठी त्या भागातील प्रत्येक माजी नगरसेवकांकडे लोकांना आणण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार व त्या त्या प्रभागातील माजी नगरसेवकांना प्रत्येक विधानसभा मतदार संघातून किमान ५ ते १० हजार लोक आणण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यासाठी आपली बसेस आणि खाजगी गाड्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा- एक तासाचा पंतप्रधानांचा दौरा, ७५ हजार कोटीचे प्रकल्प, महामार्ग, रेल्वे आणि मेट्रोही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर ग्रामीण मधून १५ हजार लोक येतील त्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी विविध भागात जाऊन पदाधिकाऱ्याच्या बैठकी घेत त्यांना वाहनाची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले