अकोला : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा चित्रपट ‘जवान’ नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. अकोल्यातील ‘एसआरके वॉरियर्स’ या समूहाने चित्रपटगृहावर शाहरुख खानचा मोठा फलक लावला. समाजमाध्यमांवर याची चित्रफीत पाहून बॉलीवूड किंग शाहरुख खान त्या फलकावर चांगलाच भावला आहे. त्याने आपल्या अकोलेकर चाहत्यांचे आभार मानत, ‘असेच प्रेम करा, आनंदी रहा’, असे ट्विट केले.

हेही वाचा >>> शाहरुखच्या ‘जवान’चा ‘गोरखपुर रुग्णालय दुर्घटने’शी नेमका संबंध कसा? जाणून घ्या ‘या’ दाहक वास्तवाबद्दल

शाहरुख खानचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जवान चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या तीन दिवसांपासून सिनेमागृहात गर्दी करीत आहेत. अकोल्यातील चित्रपटगृहात देखील शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ला शाहरुख खानच्या चाहत्यांचा समूह ‘एसआरके वॉरिअर्स’ने चित्रपटगृहावर एक मोठा फलक झळकवला. यावेळी चाहत्यांनी जल्लोष देखील केला. त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानने ती चित्रफित रि ट्विट करीत अकोलेकर चाहत्यांचे आभार मानले. ट्विटमध्ये शाहरुख म्हणाला,” धन्यवाद अकोला! तुमच्यावर प्रेम आहे आणि किती मोठे बॅनर आहे, आता सर्व काही मोठा स्टार सारखे वाटत आहे. प्रेम करा आणि आनंदी रहा.” खुद्द शाहरुख खानने आभार मानल्यामुळे त्याचे अकोलेकर चाहते सुखावले आहेत.