नागपूर : बनावट ऑनलाईन क्रिकेट ‘गेमिंग अ‍ॅप’ तयार करून देशभरातील लाखो क्रिकेटप्रेमींची आणि व्यापाऱ्यांची हजारो कोटींनी फसवणूक करणारा सोंटू ऊर्फ अनंत नवरतन जैन हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे. न्यायालयाच्या आदेशाने सोंटू दुबईतून परत आल्यानंतर त्याने जामीन मिळवला. मात्र, पोलिसांना त्याने आतापर्यंत कोणतेही सहकार्य केले नसून तो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली होईपर्यंत वेळ मारून नेत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – पाहिजेत स्टंटबाज, लाचार, कपटी उमेदवार! सोशल मीडियावर फिरते कंत्राटी आमदार भरतीच्या जाहिरातीचा धुमाकूळ

हेही वाचा – इंस्टाग्रामवरील मित्राचे मैत्रिणीला अश्लील ‘मॅसेज’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतेच दिल्लीतून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचा (एनसीबी) एक अधिकारी नागपुरात आला आणि त्याने पोलिसांचा तपास प्रभावित करण्यात प्रयत्न केला. तसेच सोंटूने आगामी निवडणुका लक्षात घेऊन शेकडो कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवित राजकीय हस्तक्षेप आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. क्रिकेट बुकी सोंटू जैन याने डायमंड एक्सचेंज नावाच्या गेमिंग अ‍ॅप्लिकेशनचा आयडी घेऊन अनेकांची फसवणूक केली. मात्र, कोणीही पुढे यायला तयार नसून पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्यांवर हळूहळू फास घट्ट केल्याचे दिसत आहे. दरम्यान, हरियाणातून नागपुरात आलेल्या सोंटूच्या वकिलाचा भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वकिलाची चौकशी सुरू आहे.