बुलढाणा: बुलढाणा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा या मागणीसाठी पदाचे राजीनामे देणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागपूर गाठले! प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी अध्यक्षांनी या मागणीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचे आश्वासन देत सबुरीचा सल्ला दिला.

माजी सरपंच रिजवान सौदागर यांच्या मार्गदर्शनाखालील पदाधिकारी व कार्यकर्ते रविवारी संध्याकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी मधील पटोले यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. रिजवान सौदागर, दत्ता काकस, गजानन मामलकर, सुनील तायडे यांनी आपल्या भावना व भूमिका व्यक्त केली. यावर पटोले यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. बुलढाण्याची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांचीही भेट घेतल्याचे समजते.यानंतरच शिष्टमंडळाने बुलढाण्याकडे कूच केली.

हेही वाचा…शिंदेसोबत जाण्याचा निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ गटाच्या पदाधिकाऱ्यांनी २२ मार्चला चिखली येथे जाऊन जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्याकडे आपले राजीनामे दिले होते. बुलढाणा काँग्रेसला सोडण्याची मागणी करीत मित्रपक्षाच्या निष्क्रिय उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी तंबी दिली.यावर बोन्द्रे यांनी नाना पटोले यांच्या समवेत चर्चा करून माहिती दिली. दरम्यान याची दखल घेत राजीनामावीरांना चर्चेसाठी बोलविले.