बुलढाणा: बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील मोताळा नगरीतील तीन दुकानांना अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी, १७ मे रोजी मध्यरात्री लागलेल्या या आगीत तिन्ही दुकानांतील साहित्य जळून खाक झाले.

मोताळा येथील आठवडी बाजारात जय भवानी किराणा दुकान, जय इलेक्ट्रिकल या नावाची दुकानें आहेत. दोन्ही दुकानाना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या लागलेल्या आगीमूळे बाजूला असलेले हेअर सलूनला देखील आग लागली. या दुकानांमध्ये असलेल्या किराणा माल व विद्युत उपकरणे, साहित्याची अक्षरश राख रांगोळी झाली. किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकानेउन्हाळ्या निमित्त कुलर, पंखे आदिचा मोठा साठा ठेवला होता.या आगी मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान मध्यरात्री नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी बुलढाणा नगरपरिषद येथील अग्निशामक दल व मलकापूर नगरपरिषद चे अग्निशामक दल घटनास्थळी पाचरण करण्यात आले. बुलढाणा व मलकापूर येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास अथक परिश्रम करून पाण्याचा मारा केला. दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्ना नंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. मोताळा नगरपंचायत असताना सुद्धा मोताळा नगरपंचायत ला अग्निशामक यंत्रणा नाही त्यामुळे बुलढाण्यावरुन तसेच मलकापूर वरुन अग्निशामक येण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात दुकानातील मालाची अक्षरशः राख रांगोळी झाली होती आग लागल्यानंतर चाळीस मिनिटात या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा दाखल झाली. मात्र तोपर्यंत आगीमुळे मोठे नुकसान झाले होते.

फायर ब्रिगेडच नाही!

मोताळा येथे अनेक वर्षांपासून नगरपंचायत कार्यरत आहे. मात्र असे असताना सुद्धा या ठिकाणी अग्निशामक दलच उपलब्ध नाही. याची सतत मागणी असताना असताना सुद्धा नगर पंचायत प्रशासन, अध्यक्ष वा सदस्य याची दखल घ्यायला वा त्यासाठी हालचाल करायला तयार नसल्याचे दुर्देवी व तितकेच चीड आणणारे चित्र आहे. जिल्हा व नगर विकास प्रशासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहे.मात्र अद्याप या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा मिळाली नाही.जर भविष्या जर भीषण आग लागली तर यापेक्षाही मोठे नुकसान होऊ शकते यात शंका नाही त्यामुळे मोताळा नगरपंचायतला अग्निशामक यंत्रना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिक करत आहे