बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मध्यम गतीने सुरू असून बाराव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आघाडी कायम ठेवली आहे. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर असून शेतकरी नेते तथा अपक्ष रविकांत तुपकर  यांचे तिसरे स्थान कायम आहे. काही वेळापूर्वी बाराव्या फेरीचा निकाल हाती आला आहे. शिंदे सेना अर्थात महायुतीचे प्रतापराव जाधव १३ हजार ११० मतांनी आघाडीवर आहे. त्यांनी पहिल्या फेरीपासून आपली आघाडी कायम ठेवली असून  बाराव्या फेरीतही ते आघाडीवर आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : सहाव्या फेरीत काँग्रेसच्या विकास ठाकरेंना नितीन गडकरींपेक्षा जास्त मते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाराव्या फेरीत प्रतापराव जाधव  याना १लाख  ६ हजार ३१ मते मिळालीत.शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर (महाविकास आघाडी) यांना ९२ हजार ९२१ मते मिळालीत. दोन प्रबळ  पक्षीय उमेद्वाराना टक्कर देत अपक्ष रविकांत तुपकर  हे तिसरा क्रमांक टिकवून आहे बाराव्या फेरी अखेर तुपकर याना ७२ हजार९३३ मते मिळालीत. वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर चौथ्या स्थानी कायम असून त्यांना २६ हजार ४११ मते मिळालीत. दरम्यान मतांची आघाडी कायम असल्याने काही अति उत्साही मतदारांनी फटाके उडवून जल्लोष (! ) साजरा केला. दुसरीकडे रिंगणात २१ उमेदवार असतानाही अतितटस्थ मतदारांनी नोटा ( वरील पैकी कोणी नाही)ला पसंती दिली आहे. बाराव्या फेरीअखेर नोटा ला ११०९  मतदारांनी मतदान केल्याचे दिसून आले.