बुलढाणा : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले. यावेळी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली. यानंतर मेहकर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले. संध्याकाळी या सर्वांची सुटका करण्यात आली.

आज सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे गृहक्षेत्र आणि शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर मधील हे आंदोलन लक्षवेधी ठरले. गगनभेदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी महा मार्गावर ठिय्या मांडला. तसेच ‘झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी’ ढोल ताशांचा गजर करण्यात आला. यामुळे वातावरण तापल्याने एसडीओ कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

ओला दुष्काळ,विना अटी-शर्ती सातबारा कोरा, हेक्टरी किमान पन्नास हजार रुपए मदत,प्रलंबीत पिकविमे,योजनांचे रखडलेले अनुदान या प्रमुख मागण्या आणि शेतकऱ्यांना सोलर प्लेटसाठी विलंब करनाऱ्यां कंपन्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी शेतकर्यांसहीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांचे संतप्त रुप पहायला मिळाले.

तुटपुंजी मदत शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच:पाटील

यावेळी पांडुरंग पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर टिकेची तोफ डागली. शेतकरी आज मरनाच्या दारात असताना सरकार ने किमान पन्नास हजार रुपए हेक्टरी मदत देने अपेक्षित व आवश्यक होते. मात्र त्याऐवजी केवळ साडेआठ हजार रुपए व दोन हेक्टरची मर्यादा लावने म्हणजे शेतकर्यांची सरकार कडुन करण्यात आलेली क्रूर थट्टाचं असल्याचे पाटील म्हणाले. तसेच आजपर्यंत रखडलेले विमे व येलो मोझॅकमुळे रिजेक्ट केलेले शेतकरी याविषयी यापुर्वी पालकमंत्र्यांसहीत जिल्हाप्रशासना मार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या विमा पावत्यांबद्दल जाब विचारन्यात आला.

तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी रस्त्यावर येवुन निवेदन स्वीकारले. आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष कैलास पाचपोर,जिल्हापदाधिकारी सुनिल वाघमारे, तालुकाध्यक्ष धनंजय बुरकुल,तालुका सचिव कैलास पवार,उपाध्यक्ष रमेश बचाटे,उपाध्यक्ष गजानन पवार, उपाध्यक्ष रमेश माल, गजानन पवार, पंजाब पवार,प्रविण काळदाते,रवि वाघ,रमेश चनखोरे, संदीप नागरीक,दिलिप जाधव, अविनाश काळे, दत्तात्रेय गिर्हे, गजानन वाघ,लक्ष्मण धोटे,रमेश पाडोळे,शेख साबीर, दत्ता जागृत, प्रह्लाद तोंडे,प्रभाकर शेळके, रामराव वानखेडे, संदीप गरड, रवि गिरी, रवि वाघ ,विजय अवचार,पंढरी सरकटे आंदींसहीत तालुक्यालीत शेतकरी सहभागी झाले.