बुलढाणा: एसटी महामंडळाच्या विशेष बसने पंढरपूर ला सुखरूप पोहोचले… तिथे विठूमाउलीचे दर्शन घेतले… तिथून आनंदात बुलढाण्यात परतले आणि घर जवळ आले असताना बसला अपघात झाला… सोमवारी, ७ पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नजिक हा अपघात झाला. आषाढी वारीहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ते दुभाजकाला (डिव्हायडरला) धडकून उलटली .
एम.एच. ४० वाय ५८३० क्रमांकाची ही एसटी बस चिखलीजवळील महाबीज प्रक्रिया केंद्राजवळ समोर आली असता हा अपघात झाला. सुदैवाने म्हणा की भाविकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास विठ्ठलाच्या कृपेनें आशीर्वादाने प्राण हानी झाली नाही. मात्र कमिअधिक वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे.
बसमध्ये एकूण ५१ प्रवासी चालक आणि वाहक मिळून ५३ जण प्रवास करीत होते होता. या अपघातात कमिअधिक २०प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. यामुळे प्राथमिक उपचारानंतर १५जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यामध्ये भाऊसाहेब शोनाजी थांडे (वय ४५, रा. तळेगाव), पुष्पा विनोद शिंगणे (वय ३९, रा. तेल्हारा). प्रदीप रघुनाथ धर्मसकर (वय ४८, रा. दहीगाव). विठ्ठल तुलसीराम पांडे (वय ३७, रा. तळेगाव), रामप्रसाद हरिभाऊ पांडे (वय ६०, रा. तळेगाव), सुरेश दिगंबरराव फोकमारे (वय ६०, रा. सवदंरा), शोभा झोरे (वय ६०, रा. जानोरी रोड), गोविंद वासुदेव पांडे (वय ६०, रा. वडेगाव), तुकाराम पांडुरंग कोकरे (वय ६९, रा. बाळापूर), ईश्वर हरिचंद्र मोरे (वय ६५, रा. जवळा), रुख्मीना वसंत इंगळे (वय ६२, रा. बाळापूर), सुजाता राहुल वानखेडे (वय ३०, रा. चिखली), शिवाजी सुभाष जाधव (वय ३२, रा. अन्वा), नर्मदा अवचित मोरे (वय ४५, रा. मिराळवाडी, चिखली), आकाश अशोक डोके (वय ४५, रा. मंगरुळ-नवघरे) यांचा समावेश आहे.