वाशीम : पेट्रोल डिझेलच्या आवाक्या बाहेर गेलेल्या दरामुळे घरगुती सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरला जातो. या अवैध गॅस भरण्याच्या प्रकारामुळे अनेकदा अपघात होतात. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात आज शासकीय रुग्णालयाच्या बाजूला ओमनी कारमध्ये घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना अचानक कारने पेट घेतला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही गाडी कुणाची आहे, कशामुळे आग लागली, या संदर्भात पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हेही वाचा – गोंदियातील पशुसंवर्धन विभागासाठी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री? फिरता दवाखाना वाहनावर शिंदेंऐवजी ठाकरेंचेच छायाचित्र

हेही वाचा – चंद्रपूर : अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना मुनगंटीवारांनी खडसावले; म्हणाले, “आधी राहण्याची व्यवस्था करा, मगच..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगरूळपीर शहरातील शासकीय रुग्णालयाच्या बाजूला ओमनी कारमध्ये घरगुती सिलेंडर लावून गॅस भरण्यात येत असताना अचानक गाडीने पेट घेतला. बघता बघता आग वाढल्याने गाडी जाळून राख झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरपेक्षा (१४.२ किलो) व्यावसायिक सिलिंडर महाग आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर वाहनात केला जात आहे. अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर असे प्रकार सर्रास सुरू आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.