बुलढाणा: ‘शाहू परिवार’ आणि ‘वन बुलढाणा मिशन’चे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल आयोजित कार्यक्रम अयोजनाच्या परवानगीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजर्षी शाहू मल्टीस्टेट सहकारी संस्था व धनिक ॲडव्हायझर्सच्या वतीने काल, २९ जानेवारीला बुलढाण्यातील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणावर “न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यक्रम सुरू ठेवून ध्वनिक्षेपक सुरू ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला आहे. संदीप शेळके, कृष्णा सावळे यांच्यासह इतर ३ जणांविरुद्ध कार्यक्रमाच्या परवानगीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – भाजप नेत्या सना खान हत्याकांडाला नवे वळण, मुख्य आरोपी अमित साहू चालवायचा खंडणीचे रॅकेट! भ्रमणध्वनीमध्ये…

हेही वाचा – मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रात कोळ्याच्या तब्बल ४६ प्रजाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संदीप शेळके यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वन बुलढाणा मिशन आणि आम्ही करत असलेल्या कामांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद ‘कुणाच्या तरी’ डोळ्यात खुपत असल्याची सूचक प्रतिक्रिया त्यांनी नामोल्लेख न करता दिली. पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हरकत नाही, पण प्रस्थापित राजकीय पुढारी कायदा पायदळी तुडवतात ते पोलिसांना दिसत नाही का? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिसांनी कुणाच्या इशाऱ्यावर काम करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.