pension news पदोन्नतीमध्ये आरक्षण, जुनी पेन्शनसह इतर मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्यकडून राज्यभरात २४ फेब्रुवारीला ‘लोकशाही की पेशवाई’ नावाने धरणे आंदोलन करणार आहे, अशी घोषणा महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली.प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदे इंगळे पुढे म्हणाले, मागासवर्गीयांतील पदोन्नतीचा अनुशेष तातडीने भरण्याची गरज आहे.

हेही वाचा >>>गडचिरोली : जहाल नक्षलवादी दाम्पत्यास हैदराबाद येथून अटक; १७ वर्षांपासून होते फरार

मागण्यांमध्ये सरळसेवेतील अनुशेष तातडीने भरा, महत्त्वाच्या जागेवर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, ९० दिवसांवर निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना शासकीय सेवेत पूर्ववत घ्यावे, बाह्यस्त्रोत कर्मचारी घेण्याचे धोरण रद्द करा, वन विभागातील वनपाल यांच्या सेवाजेष्ठता यादीबाबत निर्णय घ्या, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने होणाऱ्या कारवाया थांबवा, एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करा, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा आदी मागण्यांचा समावेश असल्याचे इंगळे म्हणाले. याप्रसंगी कास्ट्राईबचे पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.