गडचिरोली : नक्षल चळवळीतून बाहेर पडून सुमारे १७ वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षल दाम्पत्यास गडचिरोली पोलिसांनी सोमवारी सकाळी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून अटक केली. टुगे ऊर्फ मधुकर चिन्ना कोडापे (४२, रा. बस्वापूर, ता. अहेरी) व शामला ऊर्फ जामनी मंगलू पूनम (३५, रा. बंडागुडम, छत्तीसगड) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.

गडचिरोली पोलिसांनी दोघांवरही मागील वर्षभरापासून पाळत ठेवली होती. पोलिसांनी अटक केलेला टुगे ऊर्फ मधुकर कोडापे हा नक्षल दलममध्ये भरती झाल्यानंतर अहेरी दलमचा सदस्य होता. पुढे २००६ पर्यंत तो अहेरी, जिमलगट्टा आणि सिरोंचा दलमचा कमांडर झाला. त्यानंतर तो दलम सोडून फरार झाला. त्याच्यावर ९ खून, ८ चकमकी, २ दरोडे, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व १ इतर असे २५ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याची पत्नी शामला ऊर्फ जामनी पुनम ही अहेरी दलमची सदस्य होती. तिच्यावर १ खून, ५ चकमक, १ जाळपोळ, १ दरोडा व १ इतर असे ९ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. जानेवारी २०२२ ते आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ६४ नक्षल्यांना अटक केली आहे. आजची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता व यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

हेही वाचा – चंद्रपूर : चांदा आयुध निर्माणीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; सेक्टर पाचमधील घटना

हेही वाचा – ‘खासदार संजय राऊत पिसाळलेला **, मनोरुग्ण!’; आमदार संजय गायकवाड यांची जहरी टीका

नावे बदलून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य

टुगे कोडापे व त्याची पत्नी शामला हे दोघेही २००६ मध्ये दलम सोडून फरार झाले होते. त्यानंतर दोघेही नावे बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. सध्या ते आपली ओळख लपवून हैदराबाद येथे वास्तव्य करीत होते. टुगे हा एका कंपनीत वॉचमन, तर शामला ही एका कार शोरूममध्ये काम करीत होती. त्यांच्यावर गडचिरोली पोलिसांनी वर्षभरापासून पाळत ठेवली होती. अखेर सोमवारी त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.